You are currently viewing तोक्ते वादळ नुकसान भरपाई निवड यादीत ग्रामस्तरीय कर्मचाऱ्यांच्या सदोष सर्व्हेक्षणाचा खऱ्या नुकसानग्रस्तांना बसलाय फटका.;मनसेचे प्रसाद गावडे यांचा आरोप

तोक्ते वादळ नुकसान भरपाई निवड यादीत ग्रामस्तरीय कर्मचाऱ्यांच्या सदोष सर्व्हेक्षणाचा खऱ्या नुकसानग्रस्तांना बसलाय फटका.;मनसेचे प्रसाद गावडे यांचा आरोप

खऱ्या नुकसानग्रस्तांना न्याय मिळणार का…? मनसेचा जिल्हा प्रशासनाला सवाल..


“तळं राखी तो पाणी चाखी” या सुपरिचित म्हणीची प्रचिती अलिकडेच शासनाकडून तोक्ते वादळ नुकसान भरपाई मंजूर यादी समोर आल्यानंतर पहावयास मिळत आहे.दि.15 व 16 मे 2021 रोजी झालेल्या तोक्ते वादळाचा फटका मोठ्या प्रमाणावर घरं, बागायतींना बसून जिल्हावासीयांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले होते.शासनाकडून पंचनामे प्रक्रिया पूर्ण होऊन नुकसानग्रस्तांची लाभार्थी यादी समोर येताच जिल्ह्यात बहुतांश भागात खरे नुकसानग्रस्त वंचित राहिल्याची चर्चा नाक्यानाक्यावर पहावयास मिळते.मनसेच्या माध्यमातून याबाबत जिल्ह्यातील आढावा घेतला असता यामध्ये तथ्य असून बहुतांश गावात ग्रेव्ही पातळीवरील आजी माजी लोकप्रतिनिधींसह सरपंच,सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी यांचाच अधिक भरणा असल्याचे दिसून येते.त्यामुळे खरे नुकसानग्रस्त वंचित राहिल्याचे चित्र निर्माण झाले आहे.गावी हक्काचं घर बांधून काम धंद्यासाठी जिल्हा बाहेर असलेल्या नागरिकांचे नुकसान होऊन देखील यादीत समावेश नाही,ग्रामपंचायतीत बसून पंचनामे झाल्यामुळे खऱ्या नुकसानग्रस्तांपर्यंत शासकीय कर्मचारी पोहचू शकले नाहीत,गाव पातळीवरील आजी माजी लोकप्रतिनिधींनी आपल्या मर्जीतल्या लोकांची नावे यादीत समविष्ट केली अशा प्रकारच्या तक्रारी मनसेकडे प्राप्त आहेत.एकंदर “खरे नुकसानग्रस्त वंचितच राहिले आणि ग्रामपंचायत व्यवस्थापनातील लोक लाभार्थी झाले” अशी परिस्थिती असल्याने जिल्हा प्रशासनाने याची वेळीच दखल घेऊन अन्याय झालेल्या नुकसानग्रस्तांना न्याय मिळवून द्यावा अशी मनसेची आग्रही मागणी व भूमिका असल्याचे मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.


कुडाळ /-

अभिप्राय द्या..