वेंगुर्लेतील इनरव्हील क्लबचा नुतन कार्यकारीणीचा पदग्रहण सोहळा संपन्न..

वेंगुर्लेतील इनरव्हील क्लबचा नुतन कार्यकारीणीचा पदग्रहण सोहळा संपन्न..

वेंगुर्ले /-

इनरव्हील क्लब, वेंगुर्लेने सामाजिक जाणीवेतून महिलांसाठी चांगल्या स्वरूपाचे समाजउपयोगी कार्यक्रम राबवून महिलांना सेवा देण्याचे काम करावे. कोरोनाचा काळ लक्षात घेऊन नियम पाळून कार्यक्रम घ्यावेत. असे प्रतिपादन इनरव्हीलच्या शपथ प्रदान अधिकारी विद्या करंदीकर यांनी पदग्रहण सोहळ्यांत केले. येथील साईमंगल कार्यालयात इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्लेच्या सन 2021-22 च्या नुतन कार्यकारीणीची निवड झालेल्या अध्यक्ष ज्योती देसाई यांचेसह उपाध्यक्षपदी अफशान कौरी, सचिव स्मिता दामले, खजिनदार समिक्षा वालावलकर, आय.एस.ओ. वृंदा गवंडळकर, एडीटर पूजा कर्पे यांना पदाची शपथ देण्यांत आली.सदरचा पदग्रहण सोहळा प्रमुख पाहुण्या शपथ प्रदान अधिकारी विद्या करंदीकर हस्ते व प्रमुख अथिती उमा पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी व्यासपिठावर उपस्थित मान्यवरांत मावळत्या अध्यक्षा गौरी मराठे यांचेसह इनरव्हील क्लबच्या सर्व सदस्या, रोटरीचे अध्यक्ष सदाशिव भेंडवडे, सचिव सुरेंद्र चव्हाण, प्रा. वसंतराव पाटोळे, प्रा. आनंद बांदेकर , सौ. सई चव्हाण , सौ. अक्षया गिरप यांचा समावेश होता. या कार्यक्रमांत इनरव्हील क्लबच्या नुतन सदस्या आरती गिरप, श्रीया परब यांना सदस्यपदाची शपथ प्रदान अधिकारी विद्या करंदीकर यांनी दिली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून कोरोना योध्दा म्हणून तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर-सामंत, नगरपरीषदेच्या प्रशासकिय अधिकारी संगिता कुबल, आरोग्य सेविका विनीता तांडेल, डॉ. पुजा कर्पे, डॉ. अफशान कौरी यांचा सत्कार करण्यांत आला. तसेच वेंगुर्ले नगरपरीषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना व्हीटॅमीन सी. व बी. कॉम्प्लेक्सच्या गोळ्यांचे वितरण करण्यांत आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन डॉ. पुजा कर्पे यांनी तर आभार स्मिता दामले यांनी मानले. हा कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगचे पालन करुन संपन्न झाला.

अभिप्राय द्या..