सावंतवाडीतून ९८ हजाराचा 3 किलो गांजा जप्त.;एका युवकाला अटक तर एक झाला फरार..

सावंतवाडीतून ९८ हजाराचा 3 किलो गांजा जप्त.;एका युवकाला अटक तर एक झाला फरार..

सावंतवाडी आणि कुडाळ पोलिसांची संयुक्त कारवाई…

सावंतवाडी /-

सावंतवाडी तालुक्यातील आकेरी येथे पकडण्यात आलेल्या गांज्याचे कनेक्शन सावंतवाडी शहरात असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी यापूर्वी दोघांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांना सहकार्य केल्या प्रकरणी अतुल उमेश गवस या युवकाला आज ताब्यात घेण्यात आले. तर बॉबी उर्फ फैजल बेग नामक युवक फरार झाला असून त्याच्या घरातून तब्बल ९८ हजार रुपये किंमतीचा तीन किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील संशयित युवक हे उच्चभू कुटुंबातील असून आणखीन काही बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. ही कारवाई सावंतवाडी पोलिसांच्या मदतीने कुडाळ पोलिसांनी केली.

आकेरी येथे यापूर्वी अशी कारवाई करण्यात आली होती. यात सावंतवाडी येथिल मयुरेश गुरूनाथ काडरकर (रा. सालईवाडा) व आशिष अशोक कुलकर्णी (रा. भटवाडी) या दोघा युवकांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांनी दिलेल्या माहीतीनुसार, पोलीस अतुल याच्या मागावर होते. अतुल गवस याला ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्याने बॉबी याचा पत्ता दिला. त्यानुसार कुडाळ पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक सागर शिंदे यांनी सावंतवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक तौसिफ सय्यद व सतिश कविटकर, रुपेश सारंग, स्वप्नील तांबे यांच्या मदतीने बेग याच्या घरावर छापा टाकला. यात तब्बल तीन किलो गांजा आढळून आला. मात्र छाप्याचा सुगावा लागल्यामुळे बेग हा पळून जाण्यास यशस्वी झाला. दरम्यान गवस याला आज येथिल न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. याबाबतची माहीती उपनिरिक्षक शिंदे यांनी दिले.

अभिप्राय द्या..