वैभववाडी तालुक्यातील डोंगराळ भाग खचतोय.;डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांनी सतर्क राहून वेळीच सुरक्षित ठिकाणी करावे स्थलांतर..

वैभववाडी तालुक्यातील डोंगराळ भाग खचतोय.;डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांनी सतर्क राहून वेळीच सुरक्षित ठिकाणी करावे स्थलांतर..

वैभववाडी /-

 वैभववाडी तालुक्यात गेल्या काही दिवसापासून पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. गुरूवारी रात्री पासून पावसाने हाहाकार माजविला होता. भुईबावडा घाटातील दुर्घटने पाठोपाठ काल मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसाने भुईबावडा पहिलीवाडी येथील शेवरीचा कापाट येथील डोंगराचा अर्धा भाग कोसळला असून त्यामुळे अनेक झाडे उन्मळून लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. वाडीपासून डोंगर काहीसा दूर असल्यामुळे जीवितहानी टळली. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. काल दिवसभर पावसाची अधूनमधून रिपरिप सुरूच आहे. दऱ्या खोऱ्याच्या दुर्गम भागातील नागरिकांनी सतर्क राहून सध्या सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करणे गरजेचे आहे.

अभिप्राय द्या..