आंबोली घाटात कोसळलेली दरड हटवली.;सावंतवाडी – बेळगाव व कोल्हापूर वाहतूक पूर्वरत सुरु..

आंबोली घाटात कोसळलेली दरड हटवली.;सावंतवाडी – बेळगाव व कोल्हापूर वाहतूक

आंबोली /-

गेले चार दिवस मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे सावंतवाडी-बेळगाव राज्यमार्गावर आंबोली मुख्य धबधब्याजवळ रात्री दरड व माती कोसळली होती. हा मार्ग वाहतुकीस महत्त्वाचा असल्याने दरड व माती हटवून तो वाहतुकीस मोकळा केला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे सावंतवाडी-बेळगाव राज्यमार्गावर आंबोली धबधब्यानजीक रस्त्यावर दरड व मातीचा भाग कोसळला होता. त्यामुळे सावंतवाडी-बेळगाव व कोल्हापूर मार्ग पूर्णतः ठप्प झाला होता. जिल्हा प्रशासनाला याची माहिती मिळताच याची तात्काळ दखल घेण्यात आली. त्यानंतर दरड व माती हटवून हा मार्ग वाहतुकीस पूर्ववत करण्यात आला आहे.

अभिप्राय द्या..