कुडाळ :/-
कुडाळ मधील व्यापाऱ्यांनी दोन दिवसापूर्वीच कुडाळ बाजारपेठ बंद ठेऊन जनता कर्फ्यू करण्यासाठी आवाहन केले होते. त्याला १०० % प्रतिसाद मिळाला असून बुधवार बाजाराचा दिवस असूनही १००% बाजारपेठ बंद आहे. एसटी स्टँडवर तुरळक गर्दी असून एसटी वाहतूक व मेडिकल स्टोअर्स, शासकीय कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांना तुरळक उपस्थिती आहे. कुडाळ मध्ये जनता कफ्फ्यू ची ८ ते १० दिवस अगोदर गरज होती असेही काहींचे म्हणणे होते. नगराध्यक्ष ओंकार तेली सुरुवातीपासूनच लॉकडाऊनच्या बाजूने होते परंतु त्यावेळी त्यांना अनेकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते.