You are currently viewing पुढील काळातील सर्व प्रकारच्‍या निवडणूका स्‍वबळावर.;काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे

पुढील काळातील सर्व प्रकारच्‍या निवडणूका स्‍वबळावर.;काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे

वेंगुर्ला /-


”पुढील काळातील सर्व प्रकारच्‍या निवडणूका स्‍वबळावर लढविण्‍याची पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तयारी ठेवावी. आणि आत्‍तापासून कामाला लागावे.” असा एकमुखी ठराव आज झालेल्या वेंगुर्ला तालुका कॉग्रेस पक्षाच्‍या विशेष सभेत घेण्‍यात आला.स्‍वामिनी मंगल कार्यालय वेंगुर्ले येथे, सिंधुदुर्ग जिल्‍हा कॉंग्रेसचे अध्‍यक्ष बाळा गावडे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली सभा घेण्‍यात आली.यावेळी व्‍यासपीठावर महिला जिल्‍हाध्‍यक्षा सा‍क्षी वंजारी तालुका अध्‍यक्ष विधाता सावंत, प्रदेश प्रतिनिधी दादा परब, जिल्‍हा उपाध्यक्ष व प्रवक्‍ते ईर्शाद शेख,ओबीसी सेलचे जिल्‍हा अध्‍यक्ष जगनाथ डोंगरे,पं.स. उपसभापती सिद्धेश परब,प्रदेश प्रतिनिधी दादा परब, वेंगुला शहर अध्‍यक्ष तथा नगरसेवक गटनेते प्रकाश डिचोलकर, महिला शहर अध्‍यक्षा नगरसेविका कृतिका कुबल,ओबीसी सेलचे जिल्‍हा उपाघ्‍यक्ष पांडूरंग नाटेकर उपस्थित होते.सदर सभेत तालुका व शहर निहाय असलेल्‍या बुथ कमिटया कार्यरत करणे, प्रत्‍येक जि.प. विभागात बैठकांचे आयोजन करणे तसेच विविध सेलचे पदाधिकारी नेमून कमिटया तयार करणे आदि विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्‍यात आले. उपस्थित कार्यकर्त्‍यांमधून, पुढील होऊ घातलेल्‍या नगरपरिषद, जिल्‍हा परिषद व पंचायत समिती निवडणूका कॉंग्रेस पक्षाने स्‍वबळावर लढवाव्‍यात असा आग्रह धरला आहे. त्‍यानुसार तसा ठरावही घेण्‍यात आला. यावेळी जिल्हापरिषद मतदार संघनिहाय जबाबदारीचे वाटप करण्यात आले.रेडी जिल्हापरिषद मतदार संघ सिद्धेश परब, उभादांडा मतदार संघ जगन्नाथ डोंगरे, तुळस मतदार संघ रावजी परब,आडेली मतदार संघ इर्शाद शेख,म्हापण मतदार संघ प्रकाश डिचोलकर अश्या प्रकारे जबाबदारी देण्यात आली.
यावेळी तालुका अध्यक्ष विधाता सावंत यांनी येणा-या नगरपरिषद व जिल्हापरिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये काँग्रेस एक नंबरचा पक्ष असेल असा विश्वास व्यक्त केला. जिल्‍हा प्रवक्‍ते ईर्शाद शेख यांनी पक्षाची प्रदेश कॉंग्रेसची भूमिका स्‍पष्‍ट केल्‍यावर जिल्‍हा अघ्‍यक्ष बाळा गावडे यांनी ”एकंदरीत राजकिय वातावरणाचा विचार करता, जिल्‍हयातील जनता मोठया प्रमाणावर कॉंग्रेस पक्षाबरोबर राहणार असल्‍याचे चित्र जाणवत असून, आपण सर्वांनी त्‍यांच्‍या पर्यंत पोहोचून त्‍याला चालना दिली पाहिजे.” असे मत मांडले. तर महिला जिल्‍हाध्‍यक्षा सा‍क्षी वंजारी यांनी, ”महिलांना कॉंग्रेस पक्षाच्‍या माध्‍यमातून विविध प्रकारच्‍या विकासाच्‍या संधी उपलब्‍ध करून देतानाच महिला आरक्षणातूनही महिलांना संधी उपलब्‍ध करून देण्‍यासाठी आपण सर्वांनी प्रयत्‍न करूया.” असे विचार व्‍यक्‍त केले. या वेळी तालुका अध्‍यक्ष विधाता सावंत प्रदेश प्रतिनिधी दादा परब, जिल्‍हा उपाध्यक्ष व प्रवक्‍ते ईर्शाद शेख, पं.स. उपसभापती सिद्धेश परब, ओबीसी सेलचे जिल्‍हाध्‍यक्ष जगन्नाथ डोंगरे, प्रदेश प्रतिनिधी दादा परब,वेंगुला शहर अध्‍यक्ष तथा नगरसेवक गटनेते श्री.प्रकाश डिचोलकर, महिला शहर अध्‍यक्षा नगरसेवक कृतिका कुबल, विजय खाडे यांनी चर्चेत भागघेवून आपापले विचार मांडले. या प्रसंगी, तुळस/मातोंड विभागिय अध्‍यक्ष पदी रावजी दुलाजी परब यांची निवड करण्‍यात आले.
यावेळी आरवली विभागीय अध्‍यक्ष मयुर आरोलकर,समिर वंजारी, विजय खाडे, नगरसेवक दादा सोकटे,उत्‍तम चव्‍हाण, रमेश नाईक, समिर नागवेकर, अंकुश मलबारी,पांडूरंग लोणे, प्रशांत परब, सखाराम परब, कृष्‍णा आचरेकर आदी मान्‍यवर कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्‍ताविक व आभार दादा सोकटे यांनी केले.

अभिप्राय द्या..