दैव बलवत्तर म्हणून कार चालक अपघातातून बाल बाल बचावला..

दैव बलवत्तर म्हणून कार चालक अपघातातून बाल बाल बचावला..

वैभववाडी /-

दैव बलवत्तर म्हणून कार चालक अपघातातून बाल बाल बचावला आहे.आकेरी हुमरस ,ता.कुडाळ ते कोल्हापूर असा टोयाटो कारमधून प्रवास करत असताना नाधवडे येथे कारचा पुढील डाव्या बाजूचा टायर अचानक फुटून अपघात झाला.सुदैवाने चालक बचावला मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे. या बाबत कार चालक राकेश दुर्गाराम चव्हाण राहणार आकेरी हुमरस तालुका कुडाळ यानी वैभववाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.ही घटना गुरुवारी1 जुलै रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली.


आकेरी हुमरस येथून कोल्हापूर येथे राकेश चव्हाण हे आपल्या ट्रेडींग कंपनीच्या कामानिमित्त टोयाटो कार क्रमांक-एम.एच.01:बीबी-6404 ने प्रवास करत असताना गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास नाधवडे – वैभववाडी येथे तोयाटो कारचा पुढील डाव्या बाजूच्या टायर खड्यात आदळून फुटला.या अपघातात कार रस्त्याच्या उजव्या बाजूला जाऊन झाडाला आदळून रस्त्यापासून 50 फूट दूर गेली.या अपघातात कारचे फार मोठे नुकसान झाले आहे ,मात्र कार चालक राकेश चव्हाण हे या अपघातातून बचावले आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नाही. या अपघाताची फिर्याद वैभववाडी पोलीस ठाण्यांमध्ये दिली आहे.या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली.अधिक तपास वैभववाडी पोलीस करत आहेत.

अभिप्राय द्या..