मालवण /-
ढोल पथकाना परवानगी मिळावी अन्यथा शासन स्तरावरून आर्थिक मदत मिळावी. अशी मागणी शिवमुद्रा महिला ढोल-ताशा पथकाच्या वतीने आमदार वैभव नाईक यांच्याकडे मंगळवारी करण्यात आली.
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आम्ही महिलांनी एकत्र येत ढोल पथकाची स्थापना केली. अल्प प्रमाणात का होईना पथकातील महिलांना आर्थिक स्वरूपात फायदा होत होता. मात्र कोरोना संक्रमण काळात सर्व ठप्प झाले. १ सप्टेंबर पासून शासनाने लॉकडाउन काही प्रमाणत शिथिल केल्याने बरेच दैनंदिन व्यवहार सुरु झाले. याचा विचार करता सोशल डिस्टन्स नियमांसह ढोल पथकांनाही परवानगी मिळावी. अन्यथा शासन स्तरावरून आर्थिक मदत मिळावी. अशी मागणी मालवण येथील शिवामुद्रा महिला ढोल पथकाच्या वतीने करण्यात आली आहे. मालवण दौऱ्यावर असलेल्या आमदार वैभव नाईक यांची भेट घेऊन ढोल पथकातील महिला सदस्यांनी त्यांचे लक्ष वेधले. सरकार दरबारी हा विषय मांडून आम्हाला परवानगी अथवा आर्थिक मदत मिळावी यासाठी आपण प्रयत्न करावेत अशी मागणी करण्यात आली आहे. ३५ सदस्यांच्या स्वाक्षरी असलेले निवेदन यावेळी आमदार नाईक व नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांना देण्यात आले.
कोकणातील सर्वात मोठा उत्सव असलेल्या गणेश उत्सवात ढोल वाजवून काही आर्थिक लाभ होतो. मात्र लॉक डाउन मुळे सर्वच ठप्प झाले. गेले सहा महिने सर्व आर्थिक उलाढाल ठप्प आहे. तरी आमचा विचार व्हावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page