कुडाळ /-
कुडाळ तालुक्यात काल उशीरा मिळालेल्या माहिती नुसार २८ जून सोमवारी दिवसभरात कोरोनाचे १३७ रुग्ण सापडले आहेत.आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण २१४०एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी १९८८ कंटेन्मेट झोन पूर्ण झाले आहेत.तर सध्या १५२कंटेन्मेट झोन हे शिल्लक आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात कोरोनाचे एकूण रुग्ण ८१०२ एवढे रुग्ण होते.त्यात बरे झालेले ७०७९ आणि सक्रिय रुग्ण संख्या ही ७९९ आहे आणि स्थलांतरीत रुग्ण हे,४६ आहेत,तर एकाचा आज मृत्यू झाला आहे.अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.