दोडामार्ग /-
समाज कल्याण सभापती अंकुश जाधव यांचा इशारा…
दोडामार्ग /-
१९९९ साली खासदार मा. नारायणराव राणे यांनी तालुका केल्याने दोडामार्ग वासीयांचे होणारी परवड कमी झाली असून यामुळे तालुक्यातील अनेक नागरिकांना ओळख मिळाली आहे, त्यातच सत्येत असलेल्या व सत्येत नसलेल्या अशा अनेक कार्यकर्त्यांना पद भार स्वीकारण्याची संधी देखील मिळाली आहे तसेच यामुळे दोडामार्ग बाजारपेठ मधील व्यापारी वर्गाला देखील उदरनिर्वाह चे साधन उपस्थित झाले आहे,अनेक कामांसाठी सावंतवाडी येथे जावी लागणारी परवड देखील मोठ्या प्रमाणात कमी झाली असून राणे साहेबांमुळे अशा अनेक सुविधा उपलब्ध झाले असल्याचे समाज कल्याण सभापती अंकुश जाधव यांनी म्हटले असून १९९९ साली मा. नारायण राणे यांच्या अथांग प्रयत्नातून तालुका घोषित करण्यात आला, या अगोदर दोडामार्ग वासीयांना सावंतवाडी तालुका होता व सावंतवाडी हा तालुका दोडामार्ग पासून चाळीस किलोमीटर असून तो दोडामार्ग मधील अन्य गावांसाठी तो भरपूरच लांब असल्याने व त्यातच वाहनांची सोय उपलब्ध नसल्याने दोडामार्ग वासीयांना तालुक्याच्या ठिकाणी जाणे खूप कठीण होते व आपल्या कामांची पूर्तता करणे अशक्य होते, एखाद्या कामासाठी कामा अभावी अवाढव्य रक्कम खर्च करावी लागत असून दोन दिवसांचा कालावधी देखील लागत होता,
त्यातच शासकीय योजनांचा लाभ देखील दोडामार्ग वासीयांना मिळत नसे अशा अनेक समस्या लक्षात घेता व दोडामार्ग वासीयांनची परवड पाहता खासदार नारायण राणे यांनी आपला स्वप्नातील तालुका घोषित करत आपण मात्र तो तालुका करणारच हे उदिष्ट डोळ्यासमोर ठेवत दोडामार्गला १९९९ साली तालुका घोषित केले असता आपण महसूलमंत्री असताना दोडामार्ग वासीयांसाठी तहसीलदार कार्यालयाची प्रशासकीय इमारत शासकीय भूखंडावर बुधवार दिनांक १५ ऑगस्ट २००७ साली दुपारी १२.०० वाजता मा. श्री. महसूलमंत्री तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग मा.नारायण राणे यांनी आपल्या शुभहस्ते प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन देखील केले
असता यावेळी त्यांच्या नावाची पाटी देखील लावण्यात आली होती, परंतु आता ती पाटी पाहता त्या पाटीची अतिशय दुरावस्था झालेली दिसून येत आहे हेच लक्षात घेत लोकसंवाद लाईव्ह या वृत्तवाहिनीने ही बातमी प्रसारित केली असता समाज कल्याण सभापती अंकुश जाधव यांनी याची दखल घेत येत्या आठ दिवसात खासदार मा. नारायण राणे यांच्या नावाच्या पाटी जवळील साफसफाई करावी नकेल्यास तहसीलदार कार्यालयास भाजप कार्यकर्ते घेरावा घालत याचा जाब विचारणार असा इशारा लोकसवांद या वृत्त वाहिसी संवाद साधत समाज कल्याण सभापती अंकुश जाधव यांनी दिला आहे.