हुमरमळा ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे खा.विनायक राऊत ,आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत उदघाटन..

हुमरमळा ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे खा.विनायक राऊत ,आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत उदघाटन..

कुडाळ /-

हुमरमळा ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उदघाटन आज खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते व आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत फीत कापून व फलकाचे अनावरण करून करण्यात आले. या ग्रामपंचायतीसाठी जिल्हानियोजन निधी , आमदार वैभव नाईक यांचा आमदार फंड व ग्रामपंचायत निधी असे एकूण २७ लाखाचा निधी देण्यात आला आहे. यावेळी खासदार विनायक राऊत म्हणाले, एखाद्या कार्पोरेट ऑफिस ला मागे टाकेल अशा प्रकारचे हुमरमळा ग्रामपंचायत भवन उभारण्यात आले आहे. शासनाच्या निधीचा सदुपयोग कसा करायचे हे हुमरमळा वासीयांनी दाखवून दिले आहे. या ग्रा. प.ने राबविलेला वनऔषधी लागवड प्रकल्प आदर्शवत आहे. शिवसेना प्रत्येक गावात राजकारण नव्हे तर समाजकारण करण्यासाठी काम करत आहे. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी जिल्ह्यासाठी शासकीय मेडिकल कॉलेज मंजूर करून दिले आहे. १०० कोटी रु खर्च करून दोडामार्ग येथे औषधी वनस्पती संशोधन केंद्र सुरु होत आहे. आरोग्य सुविधा वाढविल्या जात आहेत.जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेचे चांगले काम सुरु आहे. आ.वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून कुडाळ येथे महिला बाल रुग्णालय सुरु केले जात आहे. वेंगुर्लेत रुग्णालय सुरु केले जात आहे. त्यामुळे लोकहिताच्या दृष्टीने शिवसेनेचे कार्य सुरू आहे असे खा. विनायक राऊत यांनी सांगितले. आमदार वैभव नाईक म्हणाले, पक्षभेद विसरून जी ग्रामपंचायत काम करते तो गाव विकासाच्या दृष्टीने वेगवान वाटचाल करत असतो. हे हुमरमळा ग्रा. प. ने दाखवून दिले आहे.अनेक विकास कामे या गावात शिवसेनेच्या माध्यमातून झाली आहेत. येत्या काळातही गावच्या विकासासाठी लागणार निधी दिला जाणार आहे. जरी सरपंच, उपसरपंच सदस्य हे गावचे प्रमुख असले तरी गावच्या विकासासाठी प्रत्येक ग्रामस्थाने योगदान दिले पाहिजे. मग गावाचा विकास दूर नाही. ग्रामपंचायतच्या इमारतीचे काम दोन वर्षात पूर्ण करण्यात आले. यासाठी माझ्या आमदार फंडातून ५ लाखाचा निधी या आगोदर दिला आहे. अजूनही पाच लाखाचा निधी देणार असल्याची ग्वाही आ. वैभव नाईक यांनी दिली. यावेळी जि. प. गटनेते नागेंद्र परब, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, उपसभापती जयभारत पालव, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, तालुकाप्रमुख राजन नाईक, विकास कुडाळकर, सरपंच जान्हवी पालव, उपसरपंच सुरेंद्र राणे, अतुल बंगे, ग्रामसेवक सुनील माळगावकर,सचिन कदम, बाळा पावसकर, तानाजी पालव, बाळू पालव, प्रसाद मोरजकर, ग्रा. प. सदस्य एकनाथ गोसावी, मानसी कदम, भारती राणे, संचिता पालव, समीर पालव, दीक्षिता सावंत, शिवाजी पालव आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..