प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे कुडाळ पंचायत समितीच्या आवारातील डेमो हाऊसच्या बांधकामाचे पहिल्याच पावसात वाजले तीन तेरा..

कुडाळ /-

कुडाळ पंचायत समितीच्या आवारात असलेले पंतप्रधान आवास योजनेच्या डेमो हाऊसच्या बांधकामासाठी बांधलेल्या शौच्छालयासाठीचा खडडा उघडा असल्याने त्यात आता पाणी भरले आहे.सदरचे पाणी आजूबाजूच्या कार्यालयाचा वाटेवर तुंबले असल्याने कर्मचाऱ्यांना कसरत करुन कार्यालयात जावे लागत आहे.तसेच सदर त्या पाण्यात डास,कीटकनाशक तयार होण्याची दाट दाट शक्यता आहे.कुडाळ पंचायत समितीने मोठा गाजा वाजा करुन सदरचे काम सुरु केले होते.विदयमान सीअीवो प्रदिप नायर यांनी भूमीपूजन केले होते.सदरचे बांधकाम करताना नियोजनाचा अभाव दिसून येतो.शासनाचे दुर्लक्ष झालेचे दिसून येते आहे.अतीशय धिम्या गतीने सदरचे काम सुरु आहे.या कामाची वेळीच दखल शासनाने घेणे गरजेचे आहे.अशी मागणी नागरिकांनमधून होत आहे.

अभिप्राय द्या..