उभादांडा <em>रोझारिओ चर्च युथ</em>ग्रुप चा अभिनव उपक्रम..

उभादांडा रोझारिओ चर्च युथग्रुप चा अभिनव उपक्रम..

वेंगुर्ला /-

रोझारिओ युथ ग्रुप उभादांडा यांच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार कोविड प्रतिबंधक अर्सेनिक अल्बम 30, होमिओपॅथी औषधं उभादांडा गावात वाटपाचा शुभारंभ आज दि.14/6/21 रोजी श्री. सावळाराम कांबळी ( सर ) यांच्या हस्ते करण्यात आला… सिंधुदुर्ग मधील एक मोठा लोक संखेचा हा गाव असून सद्या कोरोना बादीत रुग्ण संख्या गावात वाढत असून काही रुग्ण हे दगावले आहेत. त्या अनुषंगाने सद्या गावात हुमिनिटी पॉवर वाढविण्या करिता हे औषधं अत्यंत उपयोगी असून या रोझारिओ चर्च युथ ग्रुप ने एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे त्या बद्दल त्यांचे कौतुक होत आहे. ह्या ग्रुप चे प्रमुख श्री. कार्मीस आल्मेडा, श्री. रोशन ब्रिटो, कुमारी – कार्मेलिन लुद्रिक, कुमारी – जोविता फर्नांडिस,श्री. बावतीस लुद्रिक, यांच्या फुडाकाराने हा उपक्रम हाती घेतला आहे.. या कार्यक्रमाला डॉ.संजीव लिंगवत,ग्रामपंचायत सदस्य श्रीम. टीना आल्मेडा, श्रीम. श्रद्धा कुडाळकर, श्री. गणेश चेनवणकर,उपसरपंच श्री. गणपत केळुस्कर, श्री. सेलिस्टिन फर्नांडिस, श्री. नरसुले गुरुजी, श्री. यवजन आल्मेडा, पोलीस पाटील नार्वेकर, आशा ताई निकिता घोंगे, श्री. योगीराज यादव, हे उपस्थितीत होते.श्री. कार्मीस आल्मेडा व डॉ. लिंगवत यांनी कोरोना मुक्त गाव संकल्पने साठी आपण फुडाकार घेऊया असे संबोधले व औषधं संबधी माहिती दिली.. उपस्थितीतानी रोझारिओ युथ चे आभार मानले….

अभिप्राय द्या..