You are currently viewing केंद्राने गॅसची सबसिडी पुन्हा सुरु करावी.;पेट्रोल-डिझेल,गॅस दरवाढ कमी करावी;राष्ट्रवादीचे प्रशासनाला निवेदन..

केंद्राने गॅसची सबसिडी पुन्हा सुरु करावी.;पेट्रोल-डिझेल,गॅस दरवाढ कमी करावी;राष्ट्रवादीचे प्रशासनाला निवेदन..

दोडामार्ग /-

केंद्र सरकारने गेल्या काही महिन्यांपासून देशात पेट्रोल डिझेल,याच बरोबर सर्व सामान्य जनतेला अत्यावश्यक असलेले खाद्य तेल तसेच घरगुती वापारातील गॅस सिलेंडर यांचे भरमसाठ दर वाढ केली आहे त्यामुळे सर्वसामान्य जनता वाढलेल्या महागाईमुळे हैराण झाली आहे. लोकांना अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून सर्व सामान्य जनतेची दिशाभूल केली आहे. तेव्हा ही दरवाढ कमी करावी तसेच गॅस सबसिडी सुरू करावी अशी मागणी दोडामार्ग तालुका राष्ट्रवादी काँग्रेस वतीने दोडामार्ग तहशीलदार दोडामार्ग पोलिस निरीक्षक मुख्य अधिकारी यांना निवेदन देऊन केंद्र सरकारला आमच्या भावना कळवा अशी मागणी केली.

अभिप्राय द्या..