सावंतवाडी आगारातून १४ जूनपासून कोल्हापूर, रत्नागिरी, दापोली बस सेवा सुरू.;आगार प्रमुख वैभव पडोळे यांची माहिती.

सावंतवाडी आगारातून १४ जूनपासून कोल्हापूर, रत्नागिरी, दापोली बस सेवा सुरू.;आगार प्रमुख वैभव पडोळे यांची माहिती.

सावंतवाडी /-

सावंतवाडी आगारातून १४ जूनपासून कोरोना नियमावलीचे पालन करून कोल्हापूर, रत्नागिरी व दापोली बस सेवा सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती आगार प्रमुख वैभव पडोळे यांनी दिली. पडोळे म्हणाले, सावंतवाडी-कोल्हापूर सकाळी ८.००, १३.४५ व १४.४५, सावंतवाडी-रत्नागिरी सकाळी ७.३० आणि १४.३०, सावंतवाडी-दापोली सकाळी ८.०० अशा गाड्या सोडण्यात येणार आहेत.

अभिप्राय द्या..