वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस च्या अध्यक्षपदी विवेक तिरोडकर यांची निवड…

वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस च्या अध्यक्षपदी विवेक तिरोडकर यांची निवड…

वेंगुर्ला /-

वेंगुर्ला – वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस या संस्थेच्या नूतन कार्यकारिणीची निवड पुढील ५ वर्षाकरिता करण्यात आली असून अध्यक्षपदी सामाजिक सेवा या विषयात पदव्युत्तर निष्णात असणाऱ्या विवेक तिरोडकर यांची निवड करण्यात आली.जिल्ह्यातील सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, आरोग्य आणि शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या संस्थेची नूतन कार्यकारीणी व पदाधिकारी निवड करण्यात आली. संस्थेच्या उपाध्यक्षपदी प्रदिप परुळकर आणि रवींद्र उर्फ नाना राऊळ या दोहांची तर सचिव प्रा.सचिन परुळकर, सहसचिव गुरुदास तिरोडकर, खजिनदार माधव तुळसकर, सहखजिनदार समिर राऊळ यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.कार्यकारिणी सदस्य म्हणून मंगेश सावंत,सद्गुरू सावंत,महेश राऊळ, यशवंत राऊळ,प्रवीण राऊळ,रामचंद्र सावळ,हर्षवर्धन तांबोसकर,वामन सावंत आदीची निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्य निवड करणे ही जरी कायदेशीर बाब असली तरी प्रतिष्ठानशी संलग्न सर्व सदस्य आणि हितचिंतक यांच्या सहकार्याने सामाजिक नाविन्यपूर्ण उपक्रम घेत राहू,असे प्रतिपादन नूतन अध्यक्ष विवेक तिरोडकर यांनी केले.मावळते अध्यक्ष प्रा.सचिन परुळकर यांनी नूतन अध्यक्ष आणि सदस्य यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.

अभिप्राय द्या..