कुडाळ /-

कुडाळ येथील महिला,बाल रुग्णालयाच्या कोविड सेंटरसाठी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्यावतीने तब्बल ५०० रेमडेसिवीर इंजेक्शने देण्यात आली आहेत. आज आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हि इंजेक्शने रुग्णालयाला सुपूर्त करण्यात आली.याचा कोविड रुग्णांना लाभ होणार आहे. या रुग्णालयासाठी आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जात आहेत. जिल्ह्यात कोविड रुग्णसंख्या वाढत असल्याने खा. विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत,आ. वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, यांच्या प्रयत्नांतून कुडाळ येथील महिला,बाल रुग्णालयात सुरु करण्यात आलेले डीसीएचसी सेंटर कोरोना लढ्यात महत्वपूर्ण योगदान देत आहे. रुग्णालयात सध्या ६० कोरोना रुग्ण ऑक्सिजन वर आहेत. वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रमोद वालावलकर, डॉ. गौरव घुर्ये यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांवर चांगले उपचार सुरु आहेत. रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शनची कमतरता भासता नये यासाठी आमदार वैभव नाईक यांनी ५०० रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून दिली आहेत. तसेच आ. वैभव नाईक यांनी जिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधून महिला बाल रुग्णालयाला चार वॉर्डबॉय देण्याची मागणी केली.ती मागणी मान्य करण्यात आली असून लवकरच चार वॉर्डबॉय देण्यात येणार आहे. महिला,बाल रुग्णालयाच्या ठिकाणी ऑक्सीजन प्लांट बसविण्यात येत आहे. त्याचे काम देखील सुरु आहे. शवशितपेट्याची व्यवस्था उपलब्ध केली जात आहे. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी स्वतः कोविड सेंटर मधील रुग्णांची विचारपूस केली. डॉक्टरांशी चर्चा करून अडचणी जाणून घेतल्या. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, उपसभापती जयभारत पालव,शहरप्रमुख संतोष शिरसाट, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट,विकास कुडाळकर,अतुल बंगे, सचिन काळप, संजय भोगटे,बाळा वेंगुर्लेकर, कृष्णा धुरी, राजू गवंडे, नितीन सावंत, शिवाजी घोगळे, सुनील भोगटे, बाळा पवार आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page