आजपासून राज्य परिवहन मंडळाचा  आंतरराज्य प्रवास सुरू

आजपासून राज्य परिवहन मंडळाचा आंतरराज्य प्रवास सुरू

मुंबई /-

आजपासून राज्य परिवहन मंडळांच्या बसेसची आंतरराज्य प्रवासी सेवा सुरू होणार आहे.
सध्या एसटीची राज्यांतर्गत सेवा सुरू झाली आहे. सध्या एका सीटवर एकच प्रवासी बसण्याची अनुमती आहे.
धुळे, दोंडाईचा आणि शिरपूर येथून सूरतला एसटी सेवा पहिल्या टप्यात सुरू केली जाणार आहे. प्रवाशांच्या प्रतिसादानुसार अहमदाबाद, बडोदा तसेच मध्यप्रदेशातही ही सेवा सुरू केली जाणार आहे.
टप्प्याटप्प्याने सर्वच मार्गावर एसटी सेवा सुरू करण्याचा प्रयत्न राहणार आहे.

अभिप्राय द्या..