दोडामार्ग तालुक्यात आज तब्बल 20 कोरोना पॉझिटिव्ह..

दोडामार्ग तालुक्यात आज तब्बल 20 कोरोना पॉझिटिव्ह..

दोडामार्ग /-

दोडामार्ग तालुक्‍यात आज एकूण वीस पॉझिटिव्ह रुग्ण मिळाल्याची माहिती दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक ज्ञानेश्वर ऐवळे यांनी दिली.काल एकही कोरोना रुग्ण नसल्याने दोडामार्ग तालुका वासियानी सुटकेचा श्वास घेतला होता मात्र आज तब्बल 20 रुग्ण मिळाल्याने या अगोदरच्या 113 रुग्णांत भर पडून तब्बल ही रुग्णसंख्या 133 इतकी झाली आहे.आज मिळालेल्या रुग्णांमध्ये दोडामार्ग नगरपंचायत क्षेत्रातील 12 रुग्ण कळण्यातील 02 रुग्ण घोटगेवाडीतील 03 रुग्ण व कोनाळकट्टा येथील 03 रुग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

अभिप्राय द्या..