वैभववाडी /-
झाड तोडताना झाड अंगावर पडून कामगाराचा मृत्यू झाला आहे.दिपक गोविंद पवार वय ५२ रा.नानिवडे कुरणवाडी असे त्यांचे नाव आहे.वेंगसर येथील नारळीच्या बागेत ही घटना घडली आहे.
वेंगसर गुरववाडीनजीक नारळीची बाग आहे.या बागेत मयत दिपक पवार हे कामाला होते.बागेतील झाडे तोडण्याचे काम त्यांनी अंगावर घेतले होते.सकाळी एक सुकलेले नारळीचे झाड ते तोडत होते. झाड तोडताना ते त्यांच्या अंगावर पडले.त्यामुळे त्यांच्या छातीला व डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.त्याला तातडीने वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.माञ उपचारापूर्वीच ते मयत असल्याचे वैदयकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.पंचनामा व शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.त्याच्या पश्चात तीन विवाहीत मुली तर तीन अविवाहीत मुली, भाऊ असा परिवार आहे.त्यांच्या पत्नीचे पाच वर्षापूर्वीच निधन झालेले आहे.मोलमजूरीचे काम करुन ते आपल्या तीन मुलींचा उदरनिर्वाह करीत होते.त्याच्या अपघाती मृत्यूमुळे या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या तीन मुली निराधार झाल्या आहेत.