आमदार वैभव नाईक यांनी दिली कुडाळ तालुक्यातील कडावल विद्युत कार्यालयाला भेट..

आमदार वैभव नाईक यांनी दिली कुडाळ तालुक्यातील कडावल विद्युत कार्यालयाला भेट..

कुडाळ /-


तौक्ते चक्रीवादळामुळे कुडाळ तालुक्यातील आवळेगाव, कडावल, वर्दे, हिरलोक, गिरगाव, भडगाव, निरुखे, पांग्रड, सोनवडे, घोटगे, कुपवडे, आंब्रड, पोखरण, या व आजूबाजूच्या सर्व गावामध्ये वादळामुळे अनेक ठिकाणी विद्युत पोल, वाहिन्या तुटून वीज पुरवठा खंडित झाला आहे. या अनुषंगाने आमदार वैभव नाईक यांनी कडावल विद्युत कार्यालयाला भेट देऊन आढावा घेतला. व लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या.यावेळी जि.प.गटनेते नागेंद्र परब, शीतल कल्याणकर, पप्पू पालव, संदीप सावंत, गुरुनाथ मुंज, संकेत सावंत, विद्याधर मुंज, अमित कल्याणकर, राजू मुंज, रवींद्र पांगम, लालू सावंत, प्रमोद लोट, अनुराग सावंत, सुनील सावंत तसेच विजवीतरणचे अधिकारी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..