कुडाळ /-
आज दिनांक २३ मे.रोजी कुडाळ तालुक्यातील दशावतारी कलाकाराना कुडाळ येथील शिवसेना कार्यालयात शिवसेच्या वतिने आमदार डॉ.मनीषा कायनदे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग /रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत दशावतारी कलाकाराना भेटवस्तू देण्यात आल्या.यावेळी शिवसेना तालुका प्रमुख राजन नाईक ,ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष रुपेश पावसकर ,विकास कुडाळकर ,शिवसेना शहरप्रमुख संतोष शिरसाट.उपस्थित होते.यावेळी दशावतारी कलाकार रामचंद्र जोशी सळगाव ,आनंद आत्माराम कोरगावकर घवनाळे,संतोष तुकाराम राणे नेरूर ,न्हानू रामा कोरगावकर घवनाळे ,चंद्रकांत मोहन परब भोईचे केरवडे ,भिवा विवेक निर्गुण पणदूर , नागेश एकनाथ तांडेल कुडाळ ,निळकंठ बाबाजी सावंत सळगाव ,विश्वानाथ भिकाजी सावंत मांडकुली अश्या कुडाळ तालुक्यातील दशावतारी कलाकारांना भेटवस्तू आज कुडाळ शिवसेना शाखेत देण्यात आल्या.