कुडाळ शहरातील पावसामुळे तुंबलेली गटार/नाल्यांची तातडीने साफसफाई करण्याची माजी नगरसेवक राकेश कांदे यांची मुख्याधिकारी यांच्याजवळ मागणी..

कुडाळ शहरातील पावसामुळे तुंबलेली गटार/नाल्यांची तातडीने साफसफाई करण्याची माजी नगरसेवक राकेश कांदे यांची मुख्याधिकारी यांच्याजवळ मागणी..

कुडाळ /-

चक्रीवादळामुळे कुडाळ शहरातील सार्वजनिक आणि लोकांचे वैयक्तिक नुकसान झाले आहे.परिणामी शहरातील सर्वच प्रभागातील काही गटारे /नाले माती, दगड, आदी वाहून आलेल्या साहित्यामुळे तुंबलेले आहेत. शिवाय पावसाळ्यात तोंडावर आहे तरी तातडीने सर्व प्रभागातील गटारे /नाले यांची युध्द पातळीवर साफसफाई करावी आवश्यक असल्यास तात्पुरत्या स्वरूपात जादा सफाई कर्मचारी घ्यावे.शिवाय रस्तावर जे खोदाई केल्याने चर पडलेले आहेत ते अभियंत्यांच्या देखरेखी खाली डांबरीकरण करून संबंधित नेमलेल्या ठेकेदाराकडून योग्य रितीने बुजवावेत.तसेच रस्त्यावर खोदाईमुळे पडलेले चर अभियंत्यांच्या देखरेखीखाली डांबरीकरण करावे,.अशी मागणी कुडाळ भाजपा शहर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक राकेश कांदे यांनी कुडाळ नगरपंचायत मुख्याधिकारी श्री नितीन गाढवे यांचेकडे केली आहे.

अभिप्राय द्या..