नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी दुसऱ्या दिवशीही आमदार वैभव नाईक ऑनफिल्ड

नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी दुसऱ्या दिवशीही आमदार वैभव नाईक ऑनफिल्ड

मालवण /-

तौक्ते चक्रीवादळामुळे तोंडवली तळाशील येथील सुरूचे बन येथे सुमारे ५०० झाडे उन्मळून पडली यामुळे कालपासून येथील रहदारी पूर्णतः बंद झाली असून नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज सकाळी वन विभागाचे अधिकारी यांच्या समवेत याठिकाणी भेट देत नुकसानीची पाहणी केली. पडलेली झाडे लवकरात लवकर बाजूला करून नागरिकांच्या रहदारीस मार्ग खुला करण्याच्या सूचना आ.वैभव नाईक यांनी वन अधिकाऱ्यांना दिल्या. झाडे हटविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून दुपारपर्यंत हा मार्ग पूर्ववत केला जाणार आहे. यावेळी येथील ग्रामस्थांनी आ. वैभव नाईक यांच्याकडे समस्या मांडल्या, समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी वन विभागाचे अधिकारी सारीक फकीर, तोंडवली सरपंच आबा कांदळकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

अभिप्राय द्या..