मुंबई /-

कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी सध्या राज्यात लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. महत्वाच्या कामाव्यतिरिक्त प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे.याचाच परिणाम रेल्वे प्रवासावर देखील झाला असून प्रवाशाअभावी रेल्वे गाड्या रिकाम्या धावत आहे. याचा फटका पुणे मुंबई डेक्कन क्वीनला देखील बसला असून ही गाडी उद्यापासून (१४ मे) पुढील सूचना येईपर्यंत रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान मध्य रेल्वेकडून अनेक रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. यापूर्वी रेल्वे प्रशासनाने पुणे अमरावती, पुणे नागपूर, पुणे अजनी, कोल्हापूर नागपूर, पुणे अहमदाबाद एक्सप्रेस यासारख्या अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. प्रवासी वर्ग कमी होऊन गर्दी टाळता येऊ शकते या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान प्रवाशी संख्या घटल्यामुळे पुणे मुंबई धावणारी इंद्रायणी एक्सप्रेस देखील रद्द करण्यात आली होती. परंतु आता प्रवाशांचा प्रतिसाद नसल्यामुळे डेक्कन क्वीन ही रेल्वे गाडी देखील रद्द करण्यात आली आहे.पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या या दोन्ही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने पुणे ते मुंबई दरम्यान च्या प्रवासासाठी आता स्वतंत्र गाडी नाही. पुणे मुंबई या दोन्ही शहरातून धावणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा आता पर्याय राहिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page