महाविद्यालयीन शुल्क माफ करण्यासंदर्भात युवाफोरम भारत संघटनेच्या वतीने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनां निवेदन..

महाविद्यालयीन शुल्क माफ करण्यासंदर्भात युवाफोरम भारत संघटनेच्या वतीने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनां निवेदन..

कुडाळ /-

कोरोनाच्या महामारीत विद्यार्थी व पालक आर्थिक नुकसानात आहेत.असं असताना महाविद्यालये विद्यार्थ्यांन कडून पूर्ण शुल्क आकारतायत जे चुकीचे आहे.शैक्षणिक वर्ष २०२०-२१ हे वर्ष कोरोना महामारीच्या प्रदुर्भावात गेले आहे व वाढता प्रदूर्भ पाहता महाविद्यालय सुरक्षितरित्या सुरु होण्याचे दिसत नाही.तरी सदर परिस्तिथी पाहता महाविद्यालयांना विद्यार्थ्यांनकडून पूर्ण शुल्क आकारण्याचे कोणतेही कारण दिसून येत नाही.या दरम्यान कुडाळ येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत ह्यांना भेटून महाविद्यालयीन शुल्क माफ करण्यात यावे असं युवा फोरम भारत संघटना व विद्यार्थ्यांन तर्फे निवेदन देण्यात आले.व विद्यार्थ्यांच्या मागण्यांना न्याय भेटेल अशी आम्ही अपेक्षा करत आहोत असे पालकमंत्री उदय सामंत यांनां युवा फोरम भरात संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.असे युवा फोरम भारत संघटनेचे अध्यक्ष यशवर्धन राणे यांनी सांगितले.

अभिप्राय द्या..