सावंतवाडी /-

लोकांना वाऱ्यावर सोडणार असाल, आरोग्य सुविधा देऊ शकत नसाल तर राजीनामा द्या.- सावंतवाडीचे आमदार जनतेने निवडून दिल्यानंतर गेल्या करोना काळात जनतेला वाऱ्यावर सोडून मुंबईला पळाले.तिकडून कारभार सांभाळत होते म्हणजे उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम आमदार दिपक केसरकर करत होते.पालकमंत्री,राज्याचे वित्तराज्यमंत्री असताना निधीची भरघोस तरतुदही करु शकले असते.दुर्दैवाने आपण करु शकला नाहीत म्हणुनच आज जनता कर्फ्यूची वेळ आली आहे.अशी टिका मनसे शहर अध्यक्ष आशिष सुभेदार यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे केली आहे. पत्रकात ते पुढे म्हणतात मल्टी- स्पेशलिटी हॉस्पिटल होईल तेव्हा होईल, पण जनतेला आता व्हेंटिलेटर बेड,ऑक्सिजन बेड,रेमडेसीवीर आणि अन्य सुविधांची गरज आहे. तसेच साधे ट्रामा केअर सेंटर आपण सुरु करू शकले नाहीत.मागच्या करोना काळात आपण मतदारांना भेटायला पण आले नाहीत. या करोना काळातही जनता कर्फ्यू जाहीर करून आपण मुंबईला पसार झालात असा आमदार जनतेला काय उपयोगाचा? जो आमदार आपल्या मतदारांच्या आरोग्याची काळजी घेऊ शकत नाही, या आमदारांचे जिल्ह्याचे खासदार ऐकत नाहीत,ज्या आमदाराला पालकमंत्री जुमानत नाहीत.ही वस्तुस्थिती आहे. आमदार आपल्या मतदार असलेल्या जनतेची आरोग्याची काळजी घेऊ शकत नाहीत आज करोनामुळे सुमारे ४०० लोकांचा जीव गेला आहे. आरोग्य यंत्रणा अपयशी ठरत असताना या आमदारांना मतदारांचे घेणे देणे नाही.असेच दिसुन येते. मागील पाच वर्षाच्या काळात मनसेने विरोधी पक्षाची भूमिका म्हणून सातत्याने आरोग्य सुविधा सुधारणेबाबत आवाज उठवला होता.यावेळी मनसेचे ऐकले असते आणि आरोग्य सुविधा सुधारली असती तर आज जनता कर्फ्यूची वेळ आली नसती. त्यामुळे असे आमदार मतदारांची काळजी घेऊ शकत नाही म्हणून नैतिक जबाबदारी स्विकारुन जनतेच्या हितासाठी राजीनामा द्यावा अशी मागणीही शहर अध्यक्ष आशिष सुभेदार यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page