सिंधुदुर्ग, /-


कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर भारतभर प्राणवायूचा तुटवडा प्रचंड जाणवत आहे. कुत्रिम आँक्सिजनची मागणी प्रचंड वाढली आहे. वास्तविक पर्यावरण तज्ज्ञांच्या संशोधनातून एक मोठे झाड चाळीस वर्षांच्या कालावधीत तब्बल २३ लाख रुपये किमंतीचा प्राणवायू मानवासह चराचर स्रुष्टीला नि:स्वार्थीपणे देते. भविष्यात कोव्हिड सारखे अन्य विषाणू जगभरात दबा धरून बसले आहेत. त्यामुळे व्रुक्ष तोड थांबवून प्रत्येकाने मुबलक प्राणवायू देणार्या व्रुक्षांची लागवड मोठ्या प्रमाणात करणे गरजेचे आहे, असे आवाहन आझाद हिंद शेतकरी संघटनेचे कोकण प्रदेश संघटक, जेष्ठ पत्रकार गणपत तथा भाई चव्हाण यांनी केले आहे.

प्रत्येक व्यक्तीला जगण्यासाठी दरदिवशी ५५० लिटर नैसर्गिक आँक्सिजन लागतो. मोठी झाडे दरदिवशी सरासरी २३० लिटर आँक्सिजन देतात. त्यामुळे प्रत्येकाने किमान पाच झाडे लावून जगवायला हवीत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

श्री चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे हे आवाहन केले आहे.

पिंपळाचे झाड २४ तास, वडाचे झाड २० तास, कडुनिंब १८ तास एवढा काळ पानाद्वारे वातावरणात आँक्सिजन सोडतात. तसेच करज, नाद्रुंक सारखी झाडेही मुबलक प्रमाणात वातावरणात आँक्सिजन सोडतात. तुळसही मुबलक प्रमाणात आँक्सिजन देते. त्यामुळे अशा झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड व्हायला हवी, असे स्पष्ट करुन ही झाडे वातावरण निर्माण होणारा विषारी कार्बनडाय आँक्साईड वायू मोठ्या प्रमाणात शोषतात. त्यामुळेच पर्यावरणाचे रक्षण होते. याव्यतिरिक्त सर्वं प्रकारची झाडे मानवी समुहाला, प्राणीमात्रांना आँक्सिजनसह फळे, फुले, अन्न, औषधे आदी मुबलक देतात.

जागतिक आरोग्य संघटनेसह पर्यावरण या विषयावर काम करणार्या जागतिक संस्थांच्या शास्त्रज्ञांनी अँमेझाँन सारख्या जंगलातील अनेक प्रकारच्या जंगली श्वापदांतील अनेक प्रकारच्या विषाणूमुळे भविष्यात कोव्हिड सारखे विषाणू जगभरात अनेक प्रकाराच्या महामारी फैलावण्याची दाट शक्यता आहे. मानवाने स्वार्थापोटी अशा जंगलावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केल्यास अशा महामारी फैलावू शकतात, अशी माहिती देऊन ते म्हणतात, पर्यावरणाच्या रक्षणासह मानवासह जगातील चराचर सुष्टीचे जतन करायचे असेल तर मोठ्या प्रमाणात झाडे लावली पाहिजेत. कोरोनामुळे जवळचे नातेवाईक गमविलेल्यांनी त्यांच्या स्मरणार्थ आणि आपल्या भावी पीढीच्या रक्षणासाठी व्रुक्ष लागवड केली पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page