कणकवली /-
कणकवली तालुक्यात आज बुधवारी कोरोनाचे नव्हे ६२ रुग्ण आढळून आले आहेत तर सात कोरोना बाधितांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. यामध्ये कणकवली शहर, नांदगाव, कलमठ, कुंभवडे आणि हरकुळ बुद्रुक येथील व्यक्तींचा समावेश आहे.
आज आढळून आलेल्या कोरोना बाधितांची गाव निहाय आकडेवारी अशी आहे. कणकवली शहर १०, कलमठ ७, नांदगाव ६, खारेपाटण ५ जाणवली ४, हरकुळ बुद्रुक ३, नाटळ ३, शिवडाव ३, कळसुली ३, ओटव २, वारगाव २, वरवडे २ तर बावशी, असलदे, बोर्डवे, फोंडाघाट, नरडवे, भरणी, कासारडे, आशिये, करंजे, ओसरगाव आणि तळेरे येथील प्रत्येकी १ समावेश आहे.