कणकवली /-

सध्या कोरोनाचा कहर वाढू लागला आहे. धडधाकट असलेले कोव्हीड चे रुग्ण ही अचानक अत्यावस्थ होताहेत. अचानक ऑक्सिजन लेव्हल कमी होऊन रुग्ण डेंजर झोनमध्ये जातो.अशा वेळी आवश्यकता असते ती ऑक्सिजन ची. कणकवली शहरातील मानवता ग्रुपचे सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते रुपेश खाडये यांनी स्वतः पदरमोड करून कोव्हीडबाधित गरजू रुग्णांसाठी 24 पोर्टेबल ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध केले आहेत. केवळ कणकवलीच नव्हे तर जिल्ह्यातील ज्या रुग्णांना आवश्यकता असेल त्यांना मोफत हे ऑक्सिजन सिलेंडर पुरविण्यात येणार आहेत. पोर्टेबल ऑक्सिजन सिलेंडरसाठी अशोक करंबेळकर मोबा. 9921175422, डॉ. विद्याधर तायशेट्ये, संजीवनी हॉस्पिटल कणकवली यांच्याशी संपर्क साधावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page