कोकण प्रदेश ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीने वाहण्यात आली भावपूर्ण श्रद्धांजली
सिंधुदुर्ग-
ऑल इंडिया धनगर समाज महासंघ( दिल्ली) साठी अतिशय दुःखदायक घटना घडली
महसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि अतिशय मनमिळाऊ तितकेच शिस्तप्रिय व्यक्तिमत्व कॅप्टन श्रीराम पाल होळकर यांचा करोनाशी लढा अपयशी ठरला. काल रात्री डेहराडून येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.अंतीम संस्कार हरिद्वार येथे आज होणार आहेत.
संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनात कॅप्टन साहेबांनी अनेक नवीन मुद्दे मांडले होते. महाराष्ट्रातून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांची प्रेमाने चौकशी केली होती.राष्ट्रीय मार्गदर्शक मा.अमरजीतराजे बारगळ जहागीरदार तळोदे संस्थान,राष्ट्रीय उपाध्यक्ष अंकुशराव भांड, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमचे मार्गदर्शक मा प्रवीण काकडे सर यांनी कॅप्टन साहेबांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्याच प्रमाणे महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे यांनी शोक व्यक्त करत आज स्वर्गीय कॅप्टन श्रीराम पाल होळकर यांचे निधनाने महासंघाचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे.अशी हळहळ व्यक्त करत कोकण प्रदेश ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीने वाहण्यात आली भावपूर्ण श्रद्धांजली .
मागील 4 महिन्यांपूर्वी महासंघाचे मार्गदर्शक सूर्यकांत राजे ही सोडून गेले.आणि आज ही दुसरी दुःखद घटना घडली. संपूर्ण भारतात प्रत्येक राज्यात महासंघाचे शिलेदार आहेत. देश भरात सर्वजण शोक व्यक्त करत आहेत. हळहळ व्यक्त करत आहेत.यांच्या जाण्याने ऑल इंडिया धनगर समाज महासंघ पोरका झाला आहे.