मुणगे गावचे माजी उपसरपंच आबा लब्दे यांचे निधन..

मुणगे गावचे माजी उपसरपंच आबा लब्दे यांचे निधन..

मसुरे /-

देवगड तालुक्यातील मुणगे गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष धाकु पांडुरंग लब्दे ( ५५ वर्ष) यांचे मुणगे कारीवणेवाडी येथील राहत्या घरी मंगळवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास निधन झाले. ‘आबा’ या टोपण नावाने ते परिचित होते. मुणगे गावचे माजी उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य म्हणून ही त्यांनी काम पाहिले होते. गावातील धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांना तसेच ग्रामदेवता श्री भगवती देवालयात होणाऱ्या सर्व कार्यक्रमाना त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतुन पुढे येत त्यांनी उद्योग व्यवसायात नावलौकिक मिळविला होता. मागील काही दिवस त्यांना मधुमेहाचा त्रास होत होता.त्यांच्यावर कोल्हापूर येथे उपचार सुद्धा चालू होते. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सून, भाऊ, भावजय, पुतणे, नातू असा परिवार आहे. डोंबिवली येथील प्रसिद्ध दशावतार कलाकार व भगवती देवी दशावतार नाट्य मंडळाचे संचालक प्रकाश लब्दे यांचे जेष्ठ बंधू तर भजनीबुवा ओंकार लब्दे व धनंजय लब्दे यांचे वडील होत. मुणगे कारीवणेवाडी स्मशानभूमीत अंतिम संस्कार बुधवारी सकाळी करण्यात आले.

अभिप्राय द्या..