कुडाळ /-
भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंञी अनिल परब यांच्या वर पञकार परीषद घेऊन टीका केली होती.या टीकेला शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी कुडाळ येथील विश्राम गृहावर त्यांना शुक्रवारी सायंकाळी प्रत्यूत्तर दिलं आहे.ज्याचं राजकीय आयुष्यचं मेवा लूबाडण्यात गेला त्या नारायण राणेंनी अनिल परब किंवा महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याचं धारीष्ठ करू नये.नारायण राणेंच्या विरूद्ध आज आपच्याकडे अनेक पुरावे आहेत.उद्योगमंञी असताना नारायण राणेंनी अनेक जमिनी हडप केल्या मग त्या वन खात्याच्या असतील किंवा एमआयडीसीच्या असतील त्यांची अनेक प्रकरणं आज सुद्धा बाहेर येतायत त्यामुळे तुमचं आयुष्यचं लुबाडणूकीत गेलं त्यांनी अनिल परबना शहानपणा शिकवण्याची गरज नाही.
तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अत्यंत संयमाने आणि तेवढ्याचं निर्धाराने महाराष्ट्रात कोरोना नियंत्रणात ठेवण्याचं काम करतायत हे महत्त्वाचं आहे.महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जिथे शिस्तीच आणि कोरोना नियंत्रीत ठेवण्याचं पुर्णपणे पालणं केलं जातय. माञ ज्यांना काविळ झालेली त्यांना सगळचं पिवळं दिसतं नारायण राणे हे सत्तेच्या खुर्चीसाठी झपाटलेले गृहस्थ आहेत त्यांना खुर्ची मिळत नाही म्हणून वेडापीसा झालेला हा माणूस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ज्या पद्धतीने बरळतोय जे बरळायचं असेल ते बरळूदे माञ शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संयमाने आणि निर्धाराने कोरोना नियंत्रणात ठेवण्याचं काम करतायत.