कुडाळ /-

कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मतदार संघातील नादुरुस्त असलेल्या अनेक रस्त्यांसाठी कोट्यावधीचा निधी मंजूर करून आणला आहे.त्यांच्या प्रयत्नांतून कुडाळ तालुक्यातील मंजूर झालेल्या प्रमुख रस्त्यांच्या कामाच्या निविदा प्रक्रिया देखील पूर्ण झाल्या आहेत. लवकरच या कामांना सुरुवात करण्यात येणार आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली कामे पुढीलप्रमाणे.

मठ कुडाळ पणदूर घोटगे रस्ता रा. मा. १७९ मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे १ कोटी ४१ लाख ९८ हजार.

कुडाळ तालुकयातील रा. मा.१७ ते पिंगुळी नेरूर जकात मार्ग प्रजिमा ४६ निधी १ कोटी १० लाख २१ हजार.

मठ कुडाळ पणदूर हुमरमळा जांभवडे घोटगे गारगोटी मार्ग रा.मा. १७९ निधी १ कोटी ०१ लाख ७५ हजार.

चौके धामापूर कुडाळ रस्ता प्रजिमा ४१ निधी ७५ लाख ९० हजार ९१२ रु.

आकेरी दुकानवाड शिवापूर रस्ता प्रजिमा ५१निधी ७९ लाख ७८ हजार ४५१रु.

सुकळवाड तळगाव बाव रस्ता प्रजिमा २७ निधी ३१ लाख १३ हजार ८९९ रु.

पिंगुळी जकात माणकादेवी रस्ता प्रजिमा ४६ निधी ५५ लाख ४२ हजार ७८४ रु.

कुडाळ रेल्वेस्टेशन रस्ता प्रजीमा ४२ निधी ३१लाख ५८हजार ४१६ रु.

कुडाळ पिंगुळी म्हापण कोचरे श्रीरामवाडी कोचरेबंदर रस्ता रा.मा. १८३निधी ४८ लाख १४ हजार ६४५ रु.

वालावल माउली मंदिर ते कुशेवाडा आंदुर्ले केळूस मुणगी रस्ता प्रजिमा ४४ निधी ९९ लाख १५ हजार ५९० रु.

दाभोली तेंडोली माङयाचीवाडी रस्ता प्रजिमा ४९ निधी ४२ लाख २४ हजार ८५६ रु. या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page