वेंगुर्ला / –
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधुन कुलदेवता मित्र मंडळ खानोली समतानगर याच्या वतीने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले असुन सदर स्पर्धा खुली आहे.कोणत्याही वयोगटातील स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होवु शकतात.
कोव्हीडचा वाढता प्रादुर्भाव पाहता सदर स्पर्धा ऑनलाईन स्वरुपाची असुन राष्टनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर या स्पर्धेचा विषय ठेवण्यात आलेला आहे. स्पर्धकांनी आपल्या मोबाईलच्या माध्यमातुन टेलिग्राम या एपच्या माध्यमातुन आपला सात मिनिटांचा व्हिडिओ ९४२००६०४४३ या क्रमांकावर पाठवायचे असुन या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक कोतवाल वेंगुर्ला संघटना उपाध्यक्ष पाडुरंग सरमळकर यांजकडून ५०० रुपये, व्दितीय पारितोषिक खानोली गावचे पोलिस पाटिल धोंडू खानोलकर यांजकडून ३०० रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी कुलदेवता मित्र मंडळाकडून २०० रुपये पुरस्कृत केले आहे .
या स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख २० एप्रिल असुन जास्तीत जास्त स्पर्धकांनी यात सहभाग घ्यावा, असे आवाहन कुलदेवता मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.