वेंगुर्ला /-
पणजी वेंगुर्ले बसफेरी सुरु करण्याबाबत वेंगुर्ले पंचायत समिती उपसभापती सिद्धेश उर्फ भाई परब यांनी वेंगुर्ले एस.टी. डेपो आगार व्यवस्थापक यांना निवेदन सादर केले आहे.१३ एप्रिल पासून सदरची बसफेरी सायंकाळी ६.४५ वा. पणजीवरुन सुरु करण्यात यावी.सदर बसफेरी सुरु न केल्यास १४ एप्रिल २०२१ रोजी शिरोडा येथून एकही बस बाहेरगावी सोडली जाणार नाही,असा इशारा सिद्धेश परब यांनी दिला आहे.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,पणजी ते वेंगुर्ले बससेवा गेली ९ वर्षे सुरु होती.सायंकाळी ६.४५ वा. पणजी बस स्थानकातून सुटणारी बसफेरी कोव्हिड १९ काळात बंद होती.ती बसफेरी नोव्हेंबर २०२० पुन्हा सुरु करण्यात आली व १९ मार्च २०२१ पासून पुन्हा बंद करण्यात आली.त्यामुळे सायंकाळी ६.१५ वा. कामावरुन सुटणाऱ्या कामगार यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.तसेच मडगाव व वेर्णा येथून घरी परतणाऱ्या कर्मचारी वर्गाचे हाल होत आहेत.तसेच बसफेरी बंद केल्यामुळे तीन महिला कर्मचारी यांनी नोकरी सोडलेल्या आहेत.त्यामुळे १३ एप्रिल पासून सदरची बसफेरी सायंकाळी ६.४५ वा. पणजीवरुन सुरु करण्यात यावी.सदरची बसफेरी सुरु न केल्यास १४ एप्रिल २०२१ रोजी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी
शिरोडा येथून एकही बस बाहेरगावी सोडली जाणार नाही,असा इशारा सिद्धेश परब यांनी दिला आहे.तरी याबाबतचे गांभीर्य लक्षात घेऊन सदरची बसफेरी १४ एप्रिल २०२१ पासून पूर्ववत सुरु करण्यात यावी,अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.