कुडाळ /-
राज्यात कोरोनाच्या रूग्णामधे वाढ होत असताना महाराष्ट्रातील १० जिल्ह्यात कोरोना सेन्सिटिव्ह घोषित केले असता त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश आहे.त्यात करून आज कुडाळ येथील बुधवारच्या आठवडा बाजारात तुफान गर्दी पहावयास मिळाली..ही दृश्य पाहिल्यावर असे वाटते की कुडाळ मधील नागरीकांना कोरोनाचा विसर पडला की काय?
आज बुधवारी कुडाळच्या आठवडा बाजारात नागरीकांची तुफान गर्दी.होती त्यात नागरिकांजवळ
ना सोशल डीस्टन्स ,ना तोंडावर मास्क. कोरोना रूग्णांची वाढ होत असताना नागरीक माञ बे फीकिर.
काही लोकांच्या तोंडावर मास्क तर काही जनांची मास्क वापरण्यात हलगर्जी.पणा करताना दिसत होती.
सार्वजनिक ठीकाणी गर्दी करूनये या जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला नागरीकांचा कोणत्याही प्रतिसाद आज आठवडा बाजारात दिसला नाही.