वैभववाडी /-
वैभववाडी शहरांमध्ये रात्रीच्यावेळी अवजड यंत्रसामुग्रीने खाजगी विकासक जमीन उत्खनन व भरावची कामे करत आहेत.मशीन व वाहनांच्या आवाजामुळे शहरातील लोकांना ध्वनिप्रदूषणला सामोरे जावे लागत आहे. या बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वैभववाडी तालुका अध्यक्ष सचिन तावडे यांनी पोलीस निरीक्षक वैभववाडी यांना निवेदन दिले आहे.
वैभववाडी शहरामध्ये रात्री 10 ते सकाळी 6 वाजे पर्यन्त या वेळेत अवजड वाहनांनी जमीनीचे उत्खननव भराव टाकण्याचे काम सुरू आहे.या कामासाठी सुरू असलेल्या मशीनच्या आवाजाची क्षमता 55 डेशीबल पेक्षा जास्त होत आहे.तसेच अन्य कामे मशिनद्वारे मोठया प्रमाणावर केली जात आहेत.मोठया वाहनांच्या ये – जा करण्यामुळे शहरातील लोकांना रात्रीच्या वेळी आवाज येऊन ध्वनीप्रदूषणाला सामोरे जावे लागत आहे.याचा फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे.रात्रीच्या उत्खननाचा त्रास मनुष्या प्रमाणे पशु पक्षाना सुद्धा होत आहे.पर्यावरणाला धोका पोहचू नये यासाठी आपण योग्य कारवाई संबंधित विकासक यांच्यावर करावी असे निवेदनात म्हटले आहे.खासगी विकासकांकडून उच्च न्यायालयाने रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ध्वनी प्रदूषण होऊ नये असे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत.या आदेशाची वैभववाडी शहरात काही विकासकांकडून पायमल्ली होत आहे.वैभववाडी शहरातील जनतेला होणार त्रास थांबवावा अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष सचिन तावडे यांनी वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.