कुडाळ /-
राष्ट्रवादी युवक काँग्रेसने रात्रीस खेळ चाले मालिकेच्या वाढत्या कोरोणाच्या पार्श्वभूमीवर रात्रीचा खेळ चाले मालिकेचे चित्रीकरण थांबविण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पोलीस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती. covid-19 चे नियम पाळले नव्हते व चित्रीकरण करण्यासाठी लागणारे कोणतीही परवानगी घेतली नव्हती. याविरुद्ध सावंतवाडी चे पोलीस उपअधीक्षक यांना निवेदन देऊन त्यांची ची प्रत कुडाळ चे पोलीस निरीक्षक कोरे साहेबांना भेटून काही दिवस पूर्वी दिली होती.
सदर निवेदनावरून आज कुडाळ पोलिसांनी रात्रीचा खेळ चाले मालिकेवर कारवाई करून चित्रीकरण बंद करण्यात आले व त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला.यामुळे राष्ट्रवादी युवक कांग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेल्या संघर्षाला यश आले असून कुडाळ पोलीस प्रशासनाने मालिकेवर केलेल्या कारवाई चे स्वागत केले आहे.