कुडाळ /-
कुडाळ तालुक्यात आज रविवारी उशिरा मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाचा ०१ रुग्ण सापडला आहे.अशी माहिती कुडाळ तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.तर आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण 624 एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी 618 कंटेन्मेट झोन पूर्ण झाले आहेत. तर सध्या 06 कंटेन्मेट झोन हे शिल्लक आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात कोरोनाचे एकूण रुग्ण १४६४ एवढे रुग्ण होते.त्यात बरे झालेले १४०८ आणि सक्रिय रुग्ण संख्या ही ११ आहे आणि स्थलांतरीत रुग्ण हे ०४ आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात ४१ रुग्ण मृत्युमुखी झाले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.