मालवण /-
साडे तीन महिन्यापूर्वी सामाजिक भावनेतून मालवणात स्थापन झालेल्या धक्का मित्रमंडळाने आज घेतलेल्या तिसऱ्या रक्तदान शिबिराचे उदघाटन मालवणचे नगराध्यक्ष श्री. महेश कांदळगावकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले या शिबिरात ७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले
मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात आज धक्का मित्रमंडळाच्या वतीने आणि रक्तपेढी सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी लायन्स क्लब मालवणचे मुकेश बावकर, मालवण पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रफुल्ल देसाई, पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण, हॉटेल अतिथी बांबूचे मालक संजय गावडे, डॉ. कपिल मेस्त्री, अखिल खान, अमेय देसाई, रक्तपेढी सिंधुदुर्ग ओरोसचे श्री. पालव, हेमंत शिरगावकर, मत्स्य उद्योजक बाबू डायस, गौरेश कांबळी आदी व इतर उपस्थित होते. प्रारंभी बाबू डायस यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी बोलताना नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी सध्या कोरोनाची दुसरी लाट अधिक तीव्र बनत चालली आहे अशा वेळी रक्ताची गरज भासण्याची शक्यता आहे त्यामुळे धक्का मित्रमंडळाने रक्तदान शिबीर आयोजित करून स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. यापूर्वीही त्यांनी रक्तदान शिबिर घेऊन समाजाप्रती असलेली बांधिलकी जोपासली होती असे सांगत ते म्हणाले आज कोरोना संक्रमण सुरु झाल्याने शासनाचे सर्व नियम प्रत्येकाने पाळणे गरजेचे आहे. मास्क वापरणे बंधनकारक असून सध्या पर्यटकांची रेलचेल वाढली आहे अशा वेळी पर्यटकांनाही मास्क विषयी जाणीव करून देणे गरजेचे आहे. शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन स्वतः हून करून कोरोना विरोधाचा लढा यशस्वी केला पाहिजे असेही ते म्हणाले.
शेवटी हेमंत शिरगावकर यांनी आभार मानले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी भूषण पिसे, प्रणव गावकर, मनीष कांबळी, अनिकेत चव्हाण, सुरेश नायडू, देवदत्त तोडणकर, स्वप्नील कदम, प्रतीक कुबल, आशिष घाडीगांवकर, रोहित चव्हाण, नितेश जाधव, विशाल आपकर, अस्लम अथनिकर, निरंजन तारी, नितीन कोतीयान, केतन मेस्त्री, अदिती रेवंडकर, छाया कांबळी, राहूल केळुसकर, रजत दळवी आदींनी अथक परिश्रम घेतले. हा कार्यक्रम मास्क तसेच सोशल डिस्टन्स पाळून करण्यात आला