मसुरे /-
महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांचे वतीने आनंदव्हाळ येथे विकेल ते पिकेल अभियान अंतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्राचे शुभारंभ जि प सदस्य हरी खोबरेकर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी तालुका कृषी अधिकारी श्री.विश्वनाथ गोसावी, आनंदव्हाळ सरपंच वैष्णवी चव्हाण , उपसरपंच शैलेश भोसले, कातवड उपसरपंच श्री.गणेश चव्हाण, कृषिमित्र श्री.अनिल सुकाळे, कृषिपर्यवेक्षक श्री.धनंजय गावडे, कृषी सहा. गोरे,श्रीम.ठाकरे, देसाई,श्री.पाटिल ग्रामसेवक चौके व शेतकरी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना श्री.खोबरेकर यांनी शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल स्वतः विक्री केल्यास चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. यात सातत्य ठेवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. तसेच असे उपक्रम कृषी विभागाने राबविल्यास शेतकरी प्रगत करण्यासाठी मदत होऊ शकते असे सांगितले. आभार विश्वनाथ गोसावी यांनी मानले.