नगरपंचायतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने आमचा विचार नकेल्यासकाँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवू.;अभय शिरसाट

नगरपंचायतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने आमचा विचार नकेल्यासकाँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवू.;अभय शिरसाट

अभय शिरसाट यांचे कुडाळमद्धे जल्लोशी स्वागत..

कुडाळ /-

शिवसेनेतील अंतर्गत राजकारणामुळे शिवसेनेला जय महाराष्ट्र करून पुन्हा घरवापशी केल्याचे अभय शिरसाट यांनी सांगून कुडाळ शहरांमध्ये काँग्रेसची ताकद आहे येत्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत जर महाविकास आघाडीच्या इतर पक्षांनी आमचा विचार सहानुभूती केला नाही तर आम्ही काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवू असे अभय शिरसाट यांनी कुडाळ येथे झालेल्या स्वागतावेळी सांगितले
शिवसेनेला जय महाराष्ट्र करून काँग्रेस वाशी झालेले अभय शिरसाट यांचे स्वागत कुडाळ शहरातील गांधी चौक येथे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले तालुकाध्यक्ष आबा मुंज, अरविंद मोंडकर, प्रकाश जैतापकर, मंदार शिरसाट, प्रसाद बांदेकर, बकत्तावर मुजावर, अरविंद शिरसाट, उल्हास शिरसाट, चिन्मय बांदेकर, घावनाळे उपसरपंच वारंग, निता राणे, बाळू अंधारी, किशोर काणेकर, विजय प्रभू, व्हि. डी. जाधव, आत्माराम जाधव, अॅड दिलीप नार्वेकर, सदासेन सावंत, पल्लवी तारी प्रसाद धडाम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी अभय शिरसाट यांनी सांगितले की, मी मूळचा काँग्रेसवालाच आहे पण शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसेनेत असलेली पाय खेचण्याची प्रवृत्ती तसेच काम करणाऱ्याला कोणताही मानसन्मान मिळत नाही त्यामुळे मी पुन्हा एकदा काँग्रेसवासीय झालो आहे आता कुडाळ शहराबरोबरच ग्रामीण भागात काँग्रेस पक्ष जोमाने वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असून येत्या कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आम्ही स्वबळावर निवडणूक लढवून जास्तीत जास्त आमचे नगरसेवक निवडून आणू. महाविकास आघाडीचा जो फॉर्मुला महाराष्ट्राचा आहे तो फॉर्मुला कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत चालणार नाही कारण या ठिकाणी काँग्रेसची ताकद आहे त्यामुळे आम्हाला जास्तीत जास्त जागा आम्ही मागणार आहोत जर यामध्ये कोणतीही तडजोड झाली नाही तर काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवून सत्ता स्थापन करेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

अभिप्राय द्या..