मसुरे /-
कोरोना काळात ग्रामपंचायतीस केलेल्या सह कार्याबद्दल मसुरे चांदेरवाडीचे सुपुत्र उद्योजक डॉ. दिपक परब यांचा सरपंच सौ. उमदी उदय परब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना परब म्हणाल्या, कोरोना काळातच नव्हे तर इतरही प्रसंगी डॉ. परब हे सढळ हस्ते मदत करत असतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध संस्था चांगल्या पद्धतीने नावारूपास आल्या आहेत. अशाच प्रकारे त्यांनी कांदळगावसाठी यापुढेही दातृत्वाकरिता अग्रेसर रहावे अशी विनंती उमदी परब यांनी केली. या सत्काराला उत्तर देताना डॉ दिपक परब म्हणाले, समाजात काम करत असताना आपले काही ऋण असते याची जाणीव ठेवून आपण जमेल तशा प्रकारची मदत करत असतो. त्या मागे प्रसिद्धी हा विषय नसून सद्भावनेने आपण हे करतो. कांदळगाव ग्रामपंचायत ने आपला जो सन्मान केला त्या बद्दल आभार व्यक्त करण्या बरोबर यापुढेही आपणांस शक्य होईल ती मदत आपण करू असे आश्वासन डॉ. परब यांनी दिले.
यावेळी माजी सभापती उदय परब, उपसरपंच आनंद आयकर, सौ. श्रृतिका कुंभार सौ. भाग्यश्री डिचवलकर सौ. माधवी कदम, सौ.अक्षता परब, पोलीस पाटील सौ. शितल परब, ग्रामसेवक श्री देसाई, कर्मचारी गजानन सुर्वे, अश्विनी लाड, आशिष आचरेकर, महेश साळकर आणि ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.