कुडाळ /-
कुडाळ मद्धे अवैध वाळूच्या गाडीचा पाठलाग करत असताना गाडीवरील ताबा सुटल्यामुळे कुडाळ तहसीलदारांच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही,मात्र तहसीलदार कुडाळ यांच्या गाडीचे नुकसान झाले आहे.ही घटना रात्री उशीरा एक वाजण्याच्या सुमारास घडली.त्यामुळेच रात्रौ जवळपास एक तास कुडाळ शहरातील वीज ही गायब झाली होती.मात्र याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद नाही,असे सांगण्यात आले.या अपघातात गाडीचे नुकसान झाले आहे.गाडी विजेच्या खांबाला आदळल्याने विद्युत वाहिन्या तुटल्या आहेत. त्यामुळे महावितरण चे मोठे नुकसान झाले आहे.अपघात घडला त्या वेळी गाडीत नेमके कोण होते,याबाबत अधिकृत माहिती समजू शकली नाही.