वेंगुर्ला/ – वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत १६ व १७ जानेवारी रोजी सकाळी १० ते ६ या वेळेत साई मंगल कार्यालय वेंगुर्ले येथे टास्क फोर्स ट्रेनिग कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.या ट्रेनिगमध्ये आगीपासून संरक्षण, अपघातानंतर करावयाचे प्रथमोपचार, स्ट्रेचर पद्धत, हार्टअॅटॅक आल्यास प्राथमिक उपचार, शॉक लागल्यास करावयाची उपाययोजना, सर्पदंश झाल्यानंतर करावयाचे उपचार आदी बाबींचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामध्ये शहरातील सर्व कार्यालयांचे एक कर्मचारी आणि नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी, अधिकारी तसेच पदाधिकारी सहभागी होणार आहेत. सदरचे प्रशिक्षण हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अंतर्गत प्रशिक्षक सतिश गिरप यांचेमार्फत देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा फायदा जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी होणार असल्याचा विश्वास नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी व्यक्त केला आहे.