कुडाळ /-
कुडाळ तालुक्यात होणाऱ्या नऊ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी 12 हजार 875 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून यामध्ये 6355 स्त्री मतदार तर 6520 पुरुष मतदार आहेत. तर निवडणुक प्रक्रीया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिस कर्मचार्यांसह एकुण १८२ कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुडाळ तालुक्यातील ९ ग्रामपंचातीसाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया एकुण २७ केंद्रावर मतदान होणार आहे. यामध्ये प्रत्येक केंद्रावर एक केंद्राध्यक्ष व तीन मतदान अधिकारी असे चार कर्मचारी तसेच पोलिस कार्यरत राहणार आहेत. निवडणुक प्रक्रियेसाठी 112 कर्मचारी तसेच पोलिस प्रशासनाचे 70 कर्मचारी तैनात ठेवण्यात येणार आहेत. तसेच यामध्ये चार झोनल अधिकारी यांचा ही समावेश असुन चार क्षेत्रीय अधिकारी यांची पथके पोलिसांच्या वतीने कार्यरत ठेवण्यात येणार आहेत. या नऊ ग्रामपंचायती निवडणूक निकाल हा १८ जानेवारीला लागणार आहे.