वेंगुर्ला /-
वेंगुर्ला तालुक्यातील आरवली व सागरतीर्थ या दोन्ही गावात खासदार विनायक राऊत व माजी पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत.तसेच राज्यामध्ये विद्यमान मुख्यमंत्री, खासदार,पालकमंत्री व स्थानिक आमदार हे शिवसेनेचेच आहेत.त्यामुळे जनतेचा कौल शिवसेनेच्या बाजूने आहे.त्यामुळे भविष्यात येथील भागाचा जास्तीत जास्त विकास शिवसेनाच करू शकेल,असा विश्वास शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाळा दळवी यांनी व्यक्त केला आहे.
वेंगुर्ला तालुक्यातील आरवली व सागरतीर्थ ग्रा.प.निवडणुका १५ जानेवारी रोजी होत आहेत.आज बुधवारी सायंकाळी प्रचार रणधुमाळी थंडावली.दरम्यान शिवसेना सिंधुदुर्गचे नेते संदेश पारकर यांनी वेंगुर्लेत आरवली व सागरतीर्थ गावात पदाधिकारीसमवेत भेट देत आढावा घेतला.यावेळी संदेश पारकर यांनी दोन्ही ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे उमेदवार निवडून द्या.दोन्ही गावांच्या विकासासाठी वरिष्ठ स्तरावरून भरीव विकासनिधी देण्याचे आश्वासन दिले.यावेळी वेंगुर्ले तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब,उपजिल्हाप्रमुख सुनिल डुबळे,सचिन देसाई,माजी सभापती – पं. स.सदस्य सुनिल मोरजकर, युवासेना तालुका अधिकारी पंकज शिरसाट,विभागप्रमुख कार्मिस आलमेडा,उपतालुकाप्रमुख सुधाकर राणे,विभागप्रमुख काशिनाथ नार्वेकर, शंकर कुडव,रोहित पडवळ,मोंडकर, प्रसाद आचरेकर, मंगेश तांडेल,ज्ञानेश्वर वस्त,श्रीकांत घाटे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.