आचरा /-
आज स्त्रिया ज्यांच्यामुळे मोकळा श्वास घेतात त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले य या अलौकिक व्यक्तित्वाचे स्मरण करणे हे आपले आद्यकर्तव्य आहे .या निमित्ताने सकाळी 11 वाजता शाळा पळसंब नं 1. ने महिला शिक्षण दिनाचे आयोजन श्री .चिदरकर याच्या घरी केले होते होते. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेसमोर कोमसाप सदस्या अनुराधा आचरेकर यांच्या हस्ते दिप प्रज्वलन व त्रिबक हायस्कुलच्या बागवे मॅडम याच्या हस्ते पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली
त्यावेळी पळसंब सरपंच चद्रकांत गोलतकर, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष श्री . रविकांत सावंत, मुख्याध्यापक सौ . असरोडकर मॅडम ,सौ . पवार मॅडम , निकीता पुजारे , श्री.चिदरकर , सौ .शुभागी सांवत ,शिक्षक स्वयंसेवक , मुले उपस्थित होते , तसेच पळसंब गावामध्ये पहिल्या महिला पोस्टमन म्हणून सेवा दिलेल्या निकिता पुजारे हिचा आणि प्रमुख उपस्थिताचा सत्कार सरपंच याच्या हस्ते करण्यात आला , त्यावेळी उपस्थित मान्यवराचे महिलावर्गाचे सरपंच यानी आभार मानले. साहित्यिक अनुराधा आचरेकर यांनी आपल्या मालवणी कवीता सादर केल्या. तर बागवे मॅडम यानी सावित्रीबाई फुले यांच्या विषयी मोलाच मार्गदर्शन केले , कार्यक्रमाचे सूत्रसचालन पवार मॅडम , तर आभार असरोडकर मॅडम यांनी मानले
फोटो
पळसंब येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी मालवणी कविता सादर करताना अनुराधा आचरेकर